
नवी दिल्ली: असे म्हणतात प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणे. पण जगात एक असे ठिकाण जेथे तुम्हाला प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा तुमच्या प्रेयसीला आय लव्ह यू म्हणण्यासाठी १३ कोटी रूपये खर्च करावे लागतात. का बसला ना जोर का झटका…. पण हे खरे आहे. या जगात असेही प्रेम व्यक्त असणारे लोक आहेत आणि त्यासाठी एवढे पैसे देखील खर्च करतात.
प्रेम व्यक्त करण्यासाठी सिंगापूरमध्ये मोजावे लागतात १३ कोटी रूपये
फोर्ब्सच्या यादीनुसार सिंगापूरचे सी ला वी रेस्टॉरंट जगातील सर्वात महागडे डेटिंग रेस्टॉरंट आहे. येथे कपल्स मोठ्या प्रमाणात येतात. येथे तुमच्या पार्टनरला डेटवर घेऊन येण्यासाठी २० लाख डॉलर म्हणजेच साधारण १३.४ कोटी रूपये खर्च करावे लागतात. एवढे पैसे दिल्यावर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येथे ८ तास घालवू शकता.
सिंगापूरच्या के सी ला वी आणि वर्ल्ड ऑफ डायमंड ग्रुपने या रेस्टॉरंटला तयार केले आहे. १५ वर्षांपासून हे हॉटेल जगभरातील लोकांना सर्व्हिस देत आहे. येथे कित्येक कपल्सने वेगवेगळ्या अंदाजात आपल्या पार्टनरला आय लव्ह यू म्हटले आहे. आणि हे शब्द म्हणण्यासाठी येथे १३ कोटी रूपये दिले आहेत. येथील वातावरण खूपच रोमॅंटिक तयार करण्यात आळे आहे. प्रत्येक्ष त्यांना आनंद देणारा असावा असे ते तयार करण्यात आले आहे.
हे रेस्टॉरंट जमीनीपासून १५० फूट उंचीवर असून येथे बसल्यानंतर तुम्हाला आकाशात बसल्यासारखाच फिल येतो असे म्हटले जाते. वेगवेगळ्या क्यूबिकलवर दिल सेफ लावण्यात आले आहे. शिवाय येथे प्रपोज करण्यासाठी खास अरेजमेंट करण्यात येते. तुम्हाला एका सजलेल्या प्लेटमध्ये आईस्क्रिम दिली जाते आणि ती खाण्यासाठी सोन्याचा चम्मच दिला जातो. या प्लेटमध्ये आईस्क्रिमसोबतच तुमच्या पार्टनरला देण्यासाठी एक डायमंड रिंगही दिली जाते.
