बीसीसीआयचा विश्वचषकासाठी टीम इंडियातील खेळाडूंसाठी नवा नियम

team-india
नवी दिल्ली – मध्यंतरीच्या काळात भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही दौऱ्यावर असताना संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड त्यांच्या सोबत असण्यावरुन मोठा वादंग झाला होता. त्यादरम्यान बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही नियम देखील घालून दिले होते. त्या नियमानुसार खेळाडूंना त्यांची पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत काही ठराविक वेळ दिला होता. पण आता आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना नवा नियम जारी केला आहे.

या संदर्भातील वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना विश्वचषकातील पहिल्या सामन्यानंतर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. खेळाडू या सामन्यानंतर आपल्या पत्नीला सोबत आणू शकणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन गेल्या वर्षभरापासून बीसीसीआयकडे दौऱ्यात पत्नी आणि गर्लफ्रेंडला सोबत नेण्याची परवानगी मागत होती.

पण क्रिकेट प्रशासकीय समितीने या परवानगीला कधीही पूर्णपणे मान्यता दिली नव्हती. मध्यंतरीच्या काळात खेळाडूंना पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत आपली पत्नी आणि गर्लफ्रेंडना सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. पण सतत संघ व्यवस्थापनाकडून होत असलेल्या मागणीमुळे बीसीसीआयने अखेर, खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडला सोबत नेण्याची परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment