रसेलच्या वादळी खेळीमागे ‘ही’ आहे लकी चार्म

andre-rusell
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करुन विजय मिळवला. आंद्रे रसेलने या सामन्यात पुन्हा एकदा 17 चेंडूत 48 धावांची धमाकेदार खेळी केली.
andre-rusell1
पण त्याच्या या वादळी खेळीमागे त्याची लकी चार्म असल्याचे म्हटले जात आहे. सामन्याच्या दिवशी बायकोसोबतचा फोटो रसेलने सोशल मीडियावर पोस्ट करून गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर पंजाबविरुद्धच्या सामन्यात रसेलने तुफान फटकेबाजी केली होती. नोव्हेंबर 2014 मध्ये रसेल आणि लॉरा यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर 2016 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते.
andre-rusell2
डॉमनिकन रिपब्लिकची लॉरा रहिवाशी आहे. लॉरा व्यावसायिक मॉडेल असून अनेक वर्षांपासून लॉरा आणि रसेल एकत्र आहेत. याआधीही अनेकवेळा रसेलने पत्नी लॉरासोबतचे फोटो शेअर केले आहेत. वेस्ट इंडीजमधील सुपर मॉडेलपैकी लॉरा एक आहे. तीसुद्धा फोटोशूट केलेले फोटो सोशल मीडियावरही शेअर करत असते.

Leave a Comment