ब्रिटीश शाही दाम्पत्याची भारतीय खाद्य पदार्थांना अधिक पसंती

prince
सातत्याने प्रसिद्धीच्या झोतामध्ये असलेले ब्रिटीश शाही घराण्याचे राजकुमार प्रिन्स विलीयम, त्याची पत्नी केट मिडलटन आणि त्यांची तीन गोजिरवाणी मुले, यांच्या परिवाराबद्दल सर्व काही जाणून घेण्याचे कुतूहल केवळ ब्रिटीश नागरिकांच नाही, तर जगभरामध्ये आहे. ब्रिटनचे भावी राज्यकर्ते म्हणून विलियम, केट आणि त्यांची अपत्ये यांच्याबद्दल ब्रिटीश जनतेच्या मनामध्ये अपार आदर आणि प्रेमाची भावना आहे. त्यामुळे ते काय करतात, कुठे जातात इथपासून काय खातात इथपर्यंत प्रत्येक गोष्टीची सातत्याने चर्चा ऐकावयास मिळत असते. राजघराण्याचे सदस्य असल्याने अर्थातच हे दांपत्य करीत असलेले भोजनही शाही थाटाचे असेल असे तुम्हाला वाटत असल्यास मात्र तुमचा हा अंदाज काहीसा चुकीचा आहे.
prince1
विलियम आणि केट यांना चविष्ट राजेशाही खाद्यपदार्थांच्या जोडीने, सर्वसामान्य जनतेप्रमाणे रेस्टॉरंटमधून मागविलेले जेवणही अतिशय प्रिय असून, यामध्ये लंडन मधील नामांकित भारतीय रेस्टॉरंट्समधून मागविलेले भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या विशेष आवडीचे आहेत. विशेषतः केटला मसालेदार, थोडे तिखट भारतीय खाद्यपदार्थ विशेष पसंत असून, विलियमला मात्र भारतीय पदार्थ आवडत असले, तरी जास्त मसालेदार जेवण विशेष मानवत नसल्याचे समजते. भारतीय खाद्यपदार्थांच्या व्यतिरिक्त या दाम्पत्याला क्वचित पिझ्झा किंवा चायनीज पदार्थही खाण्यास आवडतात.

Leave a Comment