डब्ल्यूडब्ल्यूईमधून जॉन सीनाच्या प्रेयसीची निवृत्ती

Nikki-Bella
सुपरस्टार जॉन सीनामूळे खुप चर्चेत आलेली डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार निकी बेला ही यापुढे आता फाईट करताना तुम्हाला दिसणार नाही. कारण डब्ल्यूडब्ल्यूई मधून तिने कायमस्वरूपी निवृत्ती घेतली आहे. निकीने निवृत्तीची घोषणा टोटल बेलाज या रिअलीटी शोदरम्यान केली. याआधी निकीची बहिण ब्रे बेलाने डब्ल्यूडब्ल्यूई मधून निवृत्ती घेतली होती. या दोन्ही भगिणी आता टोटल बेलाज या रियालिटी शोवर आपले लक्ष केंद्रीत करणार आहेत.
Nikki-Bella1
दरम्यान गेल्या सहा वर्षापासून जॉन सीना आणि निकी बेला एकमेंकाना डेट करत होते. दोघांनीही गेल्यावर्षी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण, जॉनने लग्नाच्या आदल्या दिवशी लग्न करण्यास नकार दिला होता. गेल्या वर्षीच निकी निवृत्ती घेणार होती, पण तिने डब्ल्यूडब्ल्यूईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विन्स मॅकमोहन यांच्या आग्रहाखातर निवृत्तीचा विचार पुढे ढकलला होता. पण निकीमध्ये आता यापुढे फाईट करण्याची इच्छा उरलेली नसल्यामूळे तिने डब्ल्यूडब्ल्यूईला कायमचा रामराम ठोकला आहे.
Nikki-Bella2
सहा महिन्यांपूर्वी वुमन्स रेसलिंग इवोल्यूशनमध्ये यूएफसी चॅम्पियन रोंडा राउजी विरोधात निकीने शेवटचा सामना खेळला होता. डब्ल्यूडब्ल्यूई वुमन्स चॅम्पियन टायटलसाठी झालेल्या या सामन्यात निकीने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत रोंडा राउजीला हरवले होते. निकी बेलाचे नाव आतापर्यंत शॉन मायकल, क्रिस जेरिको, रेंडी ऑर्टन, सी एम पंक, डेव्ह बटिस्टा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींबरोबर जोडले गेले आहे.

Leave a Comment