2022 पर्यंत बाजारपेठेत दाखल होणार हवेत उडणारी दुचाकी

hover-bikes
टोकियो – हवेत उडणारी दुचाकी जपानची एक कंपनी बाजारात आणणार आहे. २०२२च्या दरम्यान ही दुचाकी बाजारपेठेत दाखल होईल अशी माहिती ए. एल. आय. टेक्नॉलॉजीस कंपनीचे सीईओ यांनी दिली आहे.

लहान ड्रोन तयार करण्यासाठी टोकियोमधील ए.एल.आय. टेक्नॉलॉजीज कंपनी प्रसिद्ध आहे. ‘होव्हर बाईक’ तयार करण्याचे या कंपनीने जाहीर केले असून आफ्रिकेत, मध्यपूर्व आणि आशियाच्या बाजारपेठेत ही दुचाकी आणली जाणार आहे. प्रथमच हवेत उडणारी दुचाकी तयार करणार असल्याचे कंपनीचे सीईओ शुहेई कोमाट्सू यांनी सांगितले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकेल, अशा कार तयार करण्यात येणार असल्याचे जपानच्या माध्यमांनी म्हटले आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होव्हर बाईकमध्ये करण्यात आला आहे. जमिनीपासून काही सेंटीमीटर अंतरावर ही दुचाकी उडणार आहे. तसेच वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी दुचाकीत सेन्सरचा वापर करण्यात येणार आहे. पुढील वर्षी दुचाकी विकण्यासाठी मर्यादित उत्पादन करण्यात येणार आहे. मे महिन्यापासून त्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. लहान वाहनांच्या किमती एवढीच उडत्या दुचाकीची किंमत असेल, असा दावा शुहेई कोमाट्सू यांनी केला आहे.

Leave a Comment