
कोलंबो – अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्व सामन्यात खेळण्याची श्रीलंका क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली आहे.
आयपीएलचे सर्व सामने खेळणार लसिथ मलिंगा
श्रीलंका क्रिकेट बोर्डाला लसिथ मलिंगास आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्याची विनंती बीसीसीआयने केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला मंगळवारी मंजुरी दिली. मलिंगाचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. मलिंगास परवानगी दिली नसती तर तो सुरुवातीच्या सहा सामन्यास मुकला असता. त्याच्या परतण्याने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी अधिक मजबूत होणार आहे. मुंबईचा दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिल्याच सामन्यात पराभव केला होता. या सामन्यात मलिंगा खेळला नव्हता.
