सावधा व्हा! कारण परत येत आहे ‘अॅनाबेले’

hollywood
लवकरच हॉलिवूडचा थरारपट असलेल्या ‘कॉन्जुरिंग’चा तिसरा भाग रिलीज होणार आहे. या तिसऱ्या भागाचे ‘अॅनाबेले कम्स होम’, असे नाव असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक देखील समोर आला आहे. या पोस्टरवर ‘अॅनाबेले’ नावाची बाहुली पाहायला मिळते.


जेम्स वान हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गॅरी डॉबरमॅन हे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. आत्तापर्यंत ‘द कॉन्जुरिंग’च्या अॅनाबेले, ‘अॅनाबेले- द क्रियेशन’ आणि ‘द नन’ या हॉररपटांसाठी त्यांनी पटकथालेखन केले आहे. हा चित्रपट २८ जूनला रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment