अन् ब्राव्होच्या गाण्यावर असा थिरकला वॉटसन

dwayne-bravo
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचे खेळाडू हे आयपीएलमध्ये खरा जोश आणि उत्साह निर्माण करतात असे म्हटले वावगे ठरु नये. कारण या खेळाडूंची सामना संपल्यानंतर त्याचे सेलिब्रशन करण्याची पद्धतच वेगळी असते. अशाच एका वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूने संगळ्यानाच भूरळ घातली आहे. डीजे ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन… चॅम्पियन गाणे गात संगीत क्षेत्रात दमदार एन्ट्री केली. आता त्याचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. ब्राव्होने या गाण्यात आशिया खंडातील क्रिकेट संघांचे कौतुक केले आहे. गाण्यात त्याने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघाचे आणि संघातील खेळाडूंचे भरभरून कौतुक केले.


बुधवारी धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनला ब्राव्होच्या याच बहुचर्चित गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्स विरोधातील सामना जिंकल्यानंतर आपल्या या नव्या गाण्यावर ब्राव्होने वॉटसनला थिरकण्यास भाग पाडले.

चेन्नईने आयपीएलच्या या बाराव्या हंगामात आतापर्यंतर आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. वॉटसनची तुफानी फलंदाजी दिल्ली विरुद्धच्या या सामन्यात पाहायला मिळाली. वॉटसनने 26 चेंडूत 44 धावांची खेळी केली. याच जोरावर चेन्नईने सामना जिंकला.

Leave a Comment