उद्या या वेळेत बंद राहणार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

express-way
पुणे : उद्या दुपारी बारा ते दोन वाजण्याच्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला असून जाहिरात कमान या महामार्गावर उभारायची असल्यामुळे हा ब्लॉक घेण्यात आला असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे. फूडमॉल जवळ मुंबई-पुणे महामार्गवरुन जाणाऱ्या जड वाहनांना थांबविण्यात येणार आहे. वाहन चालकांनी मेगा ब्लॉकची दखल घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिस विभागातील अधीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.

दोन तास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बंद राहणार आहे. द्रुतगतीवरील किलोमीटर क्र. १० जवळ दिशादर्शक फलक ओव्हरहेड गंट्री बसविण्याचे काम रस्ते विकास महामंडळाच्यावतीने १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाताना द्रुतगती मार्ग २ तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाहनचालकांना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मेगा ब्लॉक दरम्यान पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानुसार वाहतूक खालापूर टोल नाका-खालापूर गाव- खालापूर टोलनाका मार्गे चौक फाटा-दौंड फाटा-शेडुंग टोल-अजीवली फाटा ते परत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग अशी वळविण्यात येणार आहे.

Leave a Comment