या म्हणतात जुगाड! शेतकऱ्याने ऑडीची बनवली घोडागाडी

audi
रशियातील एका शेतकऱ्याने एक असा जुगाड केला आहे, ज्यामुळे तो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. या शेतकऱ्याने चक्क ऑडीपासून एक घोडागाडी तयार केली असून, त्याने या घोडागाडीला ऑडी 40 असे नाव दिले आहे. त्याने ही घोडागाडी ऑडी 80 सेडान कारपासून बनवली आहे. या शेतकऱ्याचे नाव अलेक्सई उइसिकोव्ह असून तो ३१ वर्षांचा आहे. आपण केलेल्या संशोधनामुळे तो खुपच आनंदी आहे. त्याबरोबर तो त्याच्या घोडागाडीला कारपेक्षा अधिक सुरक्षित मानतो.
audi1
(फोटो सौजन्य एएफपी)
या संदर्भातील वृत्त एएफपीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एक फार जुनी ऑडी 80 सेडान कार या शेतकऱ्याच्या शेजाऱ्याकडे होती. पण ती फारच दयनीय अवस्थेत होती. त्याचे अंजरपंजर ढिले झाले होते. अलेक्सईने त्याच्या शेजाऱ्याकडे त्या कारची मागणी केली आणि शेजाऱ्याने देखील त्याला ती आनंदाने देऊन टाकली. अलेक्सईने त्या कारच्या इंजिनासोबतच बॉडी पार्ट्स देखील कापले आणि स्टेअरिंगच्या भागात प्लास्टिक ट्यूब जोडून त्याला घोडा जुंपला.
audi2
(फोटो सौजन्य एएफपी)
अलेक्सई सांगतो की, ऑडी ४० आहे ही कारण ऑडी ८० ला मी अर्ध केले. या घोडागाडीचा वापर अलेक्सई त्याच्या शेतातील कामांसाठी करतो. तो सांगतो की, माझ्या मित्रांना विश्वासही बसत नव्हता की, मी असे काही करेन. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझ्या या घोडागाडीमध्ये म्युझिक प्लेअर आणि हॉर्न सुद्धा आहे.

Leave a Comment