सुरक्षा कवच तोडून धोनीच्या पाया पडण्यासाठी पोहचले चाहते

dhoni
महेंद्रसिंग धोनी हा एक खेळाडू आहे ज्याचे चाहते जगभरात आहेत. मैदानात धोनीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, पण जेव्हा त्याचे चाहते सुरक्षा कवच तोडून त्याला भेटण्यासाठी मैदानात दाखल होतात. असाच काहीसा नजारा मंगळवारी पुन्हा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाहायला मिळाला. चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्यादरम्यान धोनीच्या पाया पडण्यासाठी चाहते मैदानात पोहचले. धानी जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा एका चाहत्यांने चक्क लोटांगण घातले. कशी तरी त्यातून धोनीची सुटका करण्यात आली.
dhoni1
ब्राव्होने विजयी फटका मारला आणि सामना संपला. त्याचवेळी एक पांढरा शर्ट घातलेला एक चाहता धोनीला भेटण्यासाटी मैदानात दाखल झाला. चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटर धोनीला भेटण्यासाठी सामन्यादरम्यान मैदानात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.
dhoni2
सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे आणि असे म्हटले जात आहे की आतापर्यंत 17 वेळा चाहत्यांनी थेट सामन्यात सुरक्षेचे उल्लंघन केले आहे. त्याच वेळी सराव सत्र दरम्यान हे तीन वेळा झाले. यावर्षी आपण बोललो तर 2019 साली धोनीसोबत असे पाचवेळा झाले आहे. मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात 32 धावांची खेळी करत चेन्नई सुपर किंग्जला लीगचा दुसरा विजय मिळवून दिला.

Leave a Comment