लक्ष्मी मित्तल यांचाही बंधूना मदतीचा हात

lakshmi
भारतातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांनी धाकटे बंधू अनिल अंबानी यांचे ५८० कोटींचे कर्ज एकरकमी फेडून भावाला मदतीचा हात दिल्याची चर्चा अजूनही सुरु असतानाच भारतीय वंशाचे दुसरे बडे उद्योजक आर्सेलर मित्तल खानदानातील लक्ष्मी मित्तल यांनीही त्यांच्या धाकट्या बंधूना याच प्रकारे मदतीचा हात देऊन त्यांचे कर्जनिवारण केले असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात लक्ष्मी मित्तल किंवा त्यांचे बंधू प्रमोद यांनी याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

लक्ष्मी मित्तल यांचे धाकटे बंधू प्रमोद यांच्यावर २२१० कोटींचे कर्ज होते त्यातील १६०० कोटींची रक्कम लक्ष्मी मित्तल यांनी भरली असे समजते. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन वर गोल्बल स्टील होल्डिंगच्या नावाने हे कर्ज होते. लक्ष्मी मित्तल यांनी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी अश्या दोन महिन्यात १६०० कोटी भरल्याचे आणि प्रमोद यांचे कर्ज निवारण झाले असल्याचे ग्लोबल स्टील होल्डिंगने २० मार्च रोजी जाहीर केले आहे. प्रमोद कर्जमुक्त झाल्याने अपराधिक मामले संदर्भात सुरु झालेली त्यांची तपासणी करण्याचे कारण नाही असेही जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment