रशियन आर्मीने बनविली उडणारी एके ४७

flying-gun
रोबो टँक पाठोपाठ रशियन आर्मीने उडणाऱ्या एके ४७ ची निर्मिती केली असून ही गन हवेत उडतानाच शत्रूचा खात्मा करू शकेल. दोन प्रोपेलरच्या मदतीने ती आकाशात उडते आणि ३०० मीटर लांब असलेले लक्ष्य भेदू शकते. एके ४७ प्रमाणे एका मिनिटात ६०० राउंड फायर करायची तिची क्षमता आहे. या फ्लायिंग गन च्या चाचण्या घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

ही वास्तविक ड्रोन गन आहे. रशियन आर्म मेकर अल्माज अन्ते यांनी तिचे डिझाईन केले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यासाठीचे पेटंट फाईल केले गेले होते. ही फ्लाइंग गन एआय वर चालणार का रिमोटवर याचा खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र हवेत स्टॅबीलायझरच्या सहाय्याने ती नियंत्रित करता येणार आहे.

यात एके ४७ ला हलक्या धातूच्या फेममध्ये बसविले गेले असून छोट्या टार्गेटसाठी तिचा वापर प्रामुख्याने होऊ शकणार आहे. अर्थात ही फ्लाइंग गन चालविण्यासाठी अनुभवी माणूस लागणार आहे. ही गन हवेत असताना रीलोड करता येणार नाही आणि जोरदार वारे वाहत असतील तर तिचा वापर करता येणार नाही. युद्ध क्षेत्रात तिचा वापर होऊ शकणार नाही असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment