युरोपच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध ‘भूत’ – अ ॅन बोलिन

ghost
ब्रिटनची एकेकाळी राणी असलेल्या अॅन बोलिनविषयीच्या अनेक आख्यायिका ब्रिटनमध्ये आजच्या काळामध्ये चवीने सांगितल्या-ऐकल्या जातात. अनेक चित्रपट, नाट्ये, कथा आणि कादंबऱ्यांच्या रूपांत अॅन आजही जिवंत राहिली आहे. सहजासहजी कोणालाच उलगडले नाही असे काहीसे गूढ व्यक्तिमत्व असलेली राजे हेन्री (आठवे) यांची राणी अॅन बोलिन आजच्या काळामध्येही अनेक ऐतिहासिक संशोधनांचा विषय ठरते आहे. ब्रिटनचे राजे हेन्री (आठवे) यांनी अॅन, राज्याला वारस देऊ शकत नसल्याच्या आरोपावरून तिचा शिरच्छेद करण्याचा हुकुम फर्माविल्यानंतर टॉवर ऑफ लंडनमध्ये अॅनचा शिरच्छेद करण्यात आला होता. ब्रिटनच्या इतिहासामध्ये घडलेली ही घटना अतिशय दुःखद होती. त्यानंतर अनेकांनी अनेक ठिकाणी शिरच्छेद झालेल्या अॅनचे रक्तबंबाळ रूप वारंवार पाहिल्याचे म्हटले आहे.
ghost1
इंग्लंडच्या नॉरफोक भागातील ब्लीक्लिंग हॉल हे अॅनचे जन्मस्थान. १५३६ साली जेव्हा अॅनच्या शिरच्छेदाची वार्ता ब्लीक्लिंग हॉल येथे पोहोचली, तेव्हा डोकी नसलेले चार घोडे, अॅनचे शिर नसलेले धड ओढत घेऊन जाताना पाहिले असल्याचे अनेकांनी सांगितले होते. संपूर्ण परिसराला भयभीत करणारा असा हा प्रसंग असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आजच्या काळामध्येही दरवर्षी एकोणीस मे रोजी हीच घटना या परीसरामध्ये पहावयास मिळते अशी आख्यायिका आहे. दरवर्षी अॅनचे शीर नसलेले धड घेऊन चार घोड्यांची एक गाडी ब्लीक्लिंग हॉलपर्यंत बिनबोभाट येते आणि अचानक गायबही होत असल्याची मान्यता आहे.
ghost2
टॉवर ऑफ लंडन येथे अॅनचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी अर्थातच तिचे ‘भूत’ पाहिले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. टॉवर ऑफ लंडनमधील ‘व्हाईट टॉवर’, ‘चॅपल ऑफ सेंट पीटर अँड विन्क्युला’ येथे अॅनला दफन करण्यात आले असल्याने इथेही अनेकांना अॅनच्या ‘भुताचे’ दर्शन घडलेले आहे. त्याचप्रमाणे ‘ग्रीन टॉवर’ आणि ‘क्वीन्स हाऊस’ येथे ही अॅनला अनेकांनी पाहिले असल्याचे म्हटले आहे. नाताळच्या काळामध्ये अॅनचे भूत हेवर कासल येथे पाहिले गेल्याचे किस्से प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी अॅनने लहानपणी काही वर्षे वास्तव्य केले असून, येथे साजरा होणारा नाताळचा सण हा तिच्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ असल्याने या ठिकाणीही अॅन नाताळच्या सणाच्या वेळी पाहिली गेली असल्याच्या कथा आहेत.
ghost3
ब्रिटनच्या राणीचे औपचारिक निवासस्थान असलेल्या विंडसर कासलमधल्या अनेक लांबच लांब ‘कॉरीडोर्स’मध्ये आपले शिर आपल्या हातामध्ये घेऊन मोठ्याने किंचाळत, धावत जाणाऱ्या अॅनने अनेकांना घाबरविले असल्याचे किस्से प्रसिद्ध आहेत, तर अॅनला शिक्षा फर्माविली जाण्यापूर्वी तिला ज्याठिकाणी कैदेमध्ये ठेवले गेले होते त्या लँबेथ पॅलेसमध्ये ही अॅनचे दर्शन अनेकांना घडले आहे.

Leave a Comment