तिकिटबारीवर बॉलीवूडच्या मस्तानीचा आणि सिंघमचा आमना-सामना

ajay-devgan
बी-टाऊनमध्ये सध्या वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट तयार होत आहेत. त्यातच बायोपिक आणि सिक्वेलचा भडीमार होत आहे आणि हे चित्रपट तिकिटबारी चांगली कमाई देखील करत आहेत. त्याचबरोबर तिकिटबारीवर अनेक दिग्गज कलाकार देखील आमनेसामने येत आहेत. त्यातच पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्येही आत्तापासूनच शर्यत पाहायला मिळते. यामध्ये दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ आणि अजय देवगणचा ‘तानाजी-द अनसंग वारियर’ या चित्रपटांचा समावेश आहे.

अजय देवगणने नुकतीच त्याच्या ‘तानाजी-द अनसंग वारियर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दिवशी दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये या दोन्हीही चित्रपटांबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत. असल्यामुळे या दोन्ही चित्रपटामध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळेल.

चाहत्यांमध्ये दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटाविषयीदेखील उत्सुकता आहे. या चित्रपटाचा पहिला लूक अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. दीपिकाची लोकप्रियता पाहता या चित्रपटालाही चांगला प्रेक्षकवर्ग मिळेल, असे समीक्षकांचे मत असल्यामुळे अजय देवगण आणि दीपिका पादुकोण यांच्या या दोन्हीही चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट तिकिटबारीवर बाजी मारेल, हे येणार काळच सांगेल.

Leave a Comment