असा असू शकतो काँग्रेसचा लोकसभेसाठीचा जाहिरनामा

congress1
नवी दिल्ली – देशातील राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या २ एप्रिलला आपला जाहिरनामा प्रसिद्ध करू शकते. सोमवारी जाहिरनाम्याला काँग्रेसच्या वर्किंग समितीने अंतिम रुप दिले. या जाहिरनाम्यात हेल्थकेअर, अनुसूचित जाती-जमातींसाठी जमिनीचा अधिकार, बढतीत आरक्षण मिळण्यासाठी संविधानामध्ये संशोधन आणि महिला आरक्षण विधेयक पारित करण्यासारख्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

आपल्या जाहिरनाम्यात काँग्रेस कृषी क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणा करू शकते. त्यामध्ये कोल्ड स्टोरेज पासून फुड प्रोसेसिंग प्लांट आणि कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा होऊ शकते. अनुसूचित जातींच्या लोकांना बढतीमध्ये आरक्षण देण्याचे काँग्रेसने वचन दिले आहे. तर, न्यायपालिकेमध्ये या जातींचे प्रतिनिधित्व वाढवण्यावरही काँग्रेसचे लक्ष आहे.

काँग्रेस आपल्या जाहिरनाम्यात युनिव्हर्सल हेल्थकेअर आणि शिक्षित युवकांसाठी रोजगार देण्याचेही वचन देऊ शकते. शिक्षणात सुधार करण्याचे वचनही काँग्रेस देऊ शकते. कर्ज, शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पद भरणे आणि स्कॉलरशिप वाढवण्यावरही काँग्रेसचे लक्ष आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर काँग्रेसच्या वर्किंग समितीच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यामुळे दहशवादाविरोधात लढण्याची घोषणाही काँग्रेस करु शकते. तर, विदेशनीतिंमध्ये मोठा बदल काँग्रेस आपल्या जाहिरनाम्यात सुचवू शकते.

Leave a Comment