ऑनलाईन व्हिडिओची स्ट्रिमिंग सेवा सुरू करणार अॅपल

apple
सॅन फ्रान्सिस्को – सध्या जगभरातील मोबाईलधारकांना अॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजने भुरळ घातली आहे. आता मोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलही लवकरच या क्षेत्रात उडी घेणार आहे. ऑनलाईन व्हिडिओची स्ट्रिमिंग सेवा अॅपल ही सुरू करणार आहे. तसेच मासिक शुल्कावर गेमिंगची सेवाही देणार आहे.

स्ट्रीमिंग सेवेतील कार्यक्रमांसाठी अॅपलने १०० कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. यानंतर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि हूलबरोबर अॅपल ही स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणार आहे. एकंदरीत प्रसारण वाहिन्यांच्या तोडीस कार्यक्रम देऊन केबल टीव्हीसारखी अॅपल होईल, असे एका अमेरिकेतील माध्यमात म्हटले आहे.

अॅपल हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या अमेझिंग स्टोरीसारखा कार्यक्रम तयार करणार आहे. अमेरिकेच्या माध्यमातील वृत्तानुसार ‘शांताराम’ या कादंबरीवर एक मालिका अॅपल तयार करत आहे. डेव्हिड रॉबर्ट यांनी ही कादंबरी लिहिली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकातील तुरुंगातून पळून आलेला एक जण मुंबईत येऊन स्थायिक झाला, त्याची कथा मालिकेत असणार आहे. तसेच ‘सिक्थ सेन्स’ या हॉलिवूड चित्रपटाचे लेखक एम.नाईट श्यामलन यांचीही मालिका असणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. एकदंरीत अॅपलच्या मनोरजंन क्षेत्रातील प्रवेशाने प्रेक्षकांना आणखी चांगल्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.

Leave a Comment