विकिपीडियावरील शरद पवारांच्या प्रोफाईलशी छेडछाड, हा केला उल्लेख

sharad-pawar
मुंबई – देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला आहे. आताच्या डिजिटल युगात सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर करत आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि विकिपीडियाला देखील निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या विकिपीडियावरील प्रोफाईलमध्ये देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख करण्यात आला होता. पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईलशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केली आहे.
sharad-pawar1
पवार यांच्या प्रोफाईलशी छेडछाड झाल्याचे समोर येताच पुन्हा कोणीतरी त्यांचा उल्लेख देशातील सर्वात इमानदार नेता असा केला. शरद पवार यांचे प्रोफाईल २४ तासांच्या आत तीन वेळा बदलण्यात आले आहे. अपडेट प्रोफाईलमध्ये त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध नेता असा उल्लेख विकिपीडियावर करण्यात आला आहे. काही नेटीझन्सनी ट्विटरवर याबाबत आपले मत व्यक्तही केले आहे.
sharad-pawar2
कुणालाही विकिपीडियावरील माहितीत बदल करता येतात त्यामुळे हा प्रकार घडला. याआधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत हा प्रकार घडला होता. विकिपीडियावरील छेडछाड सध्या दुरूस्त करण्यात आली आहे. मात्र या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

Leave a Comment