या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांना केले गेले आहे ब्रिटीश शाही उपाधींनी सम्मानित

royal
ब्रिटनची राणी एलिझाबेथच्या वतीने दर वर्षी अनेक गुणवान व्यक्तींचा, शाही उपाधी देऊन सम्मान करण्यात येत असतो. ज्या व्यक्तींनी आजवर समाजकल्याण, उद्योग, राजकारण, संगीत, अभिनय आणि इतर क्षेत्रांमध्ये यांमध्ये प्राविण्य मिळविले आहे, अश्या व्यक्तींचे चयन केले जाऊन या शाही उपाधी त्यांना देण्यात येत असतात. आजवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींना या उपाधींनी सम्मानित करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध संगीतकार, गायक, अभिनेते आणि खेळाडूंचाही समावेश आहे. या शाही उपाधी वेगवेगळ्या प्रकारच्या असून, त्यांची गटवारी ही वेगळी असते.

ब्रिटीश शाही परिवारजनांच्या नावांचे हे आहेत इतिहास

प्रसिद्ध ब्रिटीश गीतकार आणि गायिका अॅडेल हिला २०१३ साली प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ‘मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ ही पदवी देण्यात आली. अॅडेल ने आजवर अनेक लोकप्रिय गीते लिहिली असून, अनेक गीते तिने गायिली देखील आहेत. तिची गीते ब्रिटनमध्ये सर्वात जास्त डाऊनलोड केली जाणारी गीते आहेत. तिने केलेल्या संगीतसेवेप्रीत्यर्थ तिला ही पदवी देऊन सम्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम याला ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर’ या उपाधीने सम्मानित करण्यात आले आहे. हा सम्मान त्याला २००३ साली राणी एलिझाबेथच्या हस्ते देण्यात आला. ‘युनिसेफ’ या बाल कल्याणासाठी कार्यरत करणाऱ्या संस्थेसाठी डेव्हिड करीत असलेल्या कामाबद्दल त्याला हा सम्मान प्राप्त झाला आहे.
royal1
हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोली हिला २०१४ साली राणी एलिझाबेथच्या हस्ते ‘ऑनररी डेम’ या पदवीने सम्मानित करण्यात आले. अनेक देशांमध्ये युद्ध परिस्थिती असताना, तेथील लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बद्दल जनजागृती करण्याचे काम अँजेलीना करीत असते. तिच्या या कामाबद्दल तिला शाही उपाधीने गौरविण्यात आले आहे. २०१७ साली व्हिक्टोरिया बेकहॅम हिला फॅशान जगतामध्ये स्वतःचे लेबल लॉन्च करून, व ते जगभरामध्ये यशस्वी करून आपली आगळी ओळख निर्माण केल्याबद्दल ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर’ हा सम्मान राणी एलिझाबेथच्या हस्ते देण्यात आला.
royal2
हॉलीवूड अभिनेता इद्रीस एल्बा याला अभिनेयक्षेत्रामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. २०१४ साली त्याला हा सम्मान प्राप्त झाला. इद्रीस एल्बा प्रमाणेच अभिनेत्री केट विन्स्लेट हिला ही अभिनयक्षेत्रामध्ये तिने आजवर केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल २०१२ साली ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर’ या सम्मानाने गौरविण्यात आले होते. केट विन्स्लेट हिचे नाव आजवर सात वेळा ‘अकॅडमी अवॉर्डस्’ करिता नॉमिनेट झाले आहे. सुप्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’ पुस्तकांच्या सिरीजची लेखिका जे के रौलिंग हिलाही साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर’ या पदवीने २००१ साली गौरविण्यात आले होते.

ब्रिटीश शाही परिवाराच्या खान-पानाशी निगडीत काही ‘ हटके ‘ तथ्ये

सुप्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलर आणि ज्युली अँड्र्यूज् यांना ही अभिनयक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर’ या पदवीने सम्मानित करण्यात आले होते. या दोघी अभिनेत्रींना ही पदवी २००० साली देण्यात आली होती.

Leave a Comment