जगामध्ये आजही बोलल्या जातात या प्राचीन भाषा

languages
पृथ्वीतलावर जेव्हा मनुष्य प्राण्यांच्या एकत्रित रहाण्याला सुरुवात झाली, तेव्हा संभाषणाच्या उद्देशाने भाषाही अस्तित्वात आली. काळाच्या ओघामध्ये या भाषेमध्ये परिवर्तन घडून येत गेले आणि ज्याप्रमाणे तंत्राज्ञानामध्ये विकास होत गेला, त्याचप्रमाणे भाषेमध्ये ही विकास होत गेला. मूळ भाषेमध्ये बदल होऊन त्यापासून अनेक इतर भाषा जन्माला आल्या. आजच्या काळामध्ये देखील भाषांमध्ये सातत्याने बदल होत असताना काही प्राचीन भाषा मात्र आजही अस्तित्वात असून वापरल्या जात आहेत. हिब्रू ही भाषा चौथ्या शतकामध्ये अस्तित्वात आली असून जगभरातील ज्यू लोकांची धार्मिक कार्यांसाठी वापरली जाणारी भाषा होती. त्यानंतर एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये हिब्रू इस्राइलची औपचारिक भाषा झाली. सध्या अस्तित्वात असलेली हिब्रू आणि बायबल मध्ये असलेल्या हिब्रू भाषेमध्ये फरक असून, आधुनिक हिब्रूवर ज्यू लोकांच्या ‘यिद्दिश’ भाषेचा प्रभाव ही पहावयास मिळतो.
languages1
‘बास्क’ ही भाषा मूळ स्पेन आणि फ्रांसच्या काही भागांमध्ये बोलली जाते. मात्र ही भाषा फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांच्या मानाने खूपच निराळी आहे. या भाषेचे मूळ इतर कोणत्या भाषेमध्ये आहे, ही भाषा अस्तिवात कशी आली यावर भाषाविशेषज्ञांमध्ये मतभेद आहेत. फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांवर मात्र लॅटीन भाषेचा प्रभाव दिसून येतो. भारतामध्ये भाषांची विविधता असून, तमिळ ही सर्वात प्राचीन भारतीय भाषांपैकी एक आहे. ही भाषा आजही वापरली जात असून, ही भाषा भारतासोबत श्रीलंका आणि सिंगापूर देशांमध्येही वापरली जाते. द्रविडीयन भाषांच्या गटातील ही भाषा असून, या गटामध्ये अनेक दाक्षिणात्य भाषांचा समावेश आहे. संशोधनकर्त्यांच्या अनुसार तमिळ भाषा तिसऱ्या शतकामध्ये अस्तिवात आली असवी. तेव्हापासून आजतागायत या भाषेचा वापर होत आला आहे.
languages2
बहुतेक सर्व युरोपीय भाषांचा उगम ‘इंडो-युरोपियन’ भाषांपासून झाला असून, त्यांमधूनच जर्मन, फ्रेंच, इटालियन इत्यादी भाषांचा जन्म झाला. मात्र इंडो-युरोपियन भाषांमध्ये ‘बाल्टिक भाषां’ची उपशाखाही असून, लिथुएनियन भाषा या उपशाखेतून जन्माला आली असल्याचे म्हटले जाते. फारसी भाषा आधुनिक काळातील इराण, अफगाणिस्तान आणि तजाकिस्तान या देशांमध्ये प्रामुख्याने बोलली जाते. या भाषेचा उगम प्राचीन पर्शियन भाषेतून झाला असून, ही भाषा ही आताच्या काळामध्ये काहीशी बदलली आहे. तरीही प्राचीन पर्शियन आणि आताच्या फारसीमध्ये पुष्कळ साम्य असून, नवव्या शतकातील पर्शियन भाषेमध्ये लिहिलेला एखादा लेख आजच्या काळातील फारसी जाणणाऱ्याला सहज वाचता येऊ शकतो.