जाणून घ्या रात्रीस खेळ चालेमधील शेवंताबाबत

shevanta
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. त्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता, पण या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेचे दुसरे पर्व सुरु झाले आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासूनच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याच मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरत असून दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
shevanta1
रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात माधव अभ्यंकर हे अण्णा नाईक ही भूमिका साकारत आहेत तर अपूर्वा नेमळेकर शेवंताच्या भूमिकेत दिसत आहे. रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेच्या आधी अपूर्वाने अनेक चित्रपट, मालिका, नाटकांत काम केले असले तरी ती शेवंता या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचली. अपूर्वाच्या चाहत्यांमध्ये या मालिकेमुळे प्रचंड वाढ झाली आहे.
shevanta2
अपूर्वा ही विवाहित असून तिचे पती हे राजकारणात आहेत. रोहन देशपांडे असे अपूर्वाच्या पतीचे नाव असून ते युवासेनेत पदाधिकारी आहेत. 18 डिसेंबर 2014 ला रोहन आणि अपूर्वाचे लग्न झाले असून त्या दोघांच्या फेसबुकच्या अकाऊंटवर एकमेकांचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. अपूर्वा ही अभिनेत्री असण्यासोबतच आर्टिफिशल ज्वेलरीचा तिचा व्यवसाय आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Leave a Comment