काश्मिरी नेत्याचे उफाळून आले पाकिस्तानवरील प्रेम

Muhammad-Akbar-Lone
नवी दिल्ली – अवघ्या काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी जय्यत तयारी केली असून तेवढाच प्रचाराचा धूरळ उडत आहे. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर चिखल फेक देखील करत आहेत. पण याच चिखलफेकी दरम्यान काहींचा आपल्या जीभेवरील ताबा देखील सुटत आहे. असेच काहीसे घडले आहे जम्मू-काश्मिरमध्ये.

जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांचे कुपवाडा येथे सभेत बोलताना पाकिस्तानवरील प्रेम उफाळून आले आहे. पाकिस्तानला कोणी जर एक शिवी दिली तर मी त्याला येथून दहा शिव्या देईन. त्याचबरोबर त्यांनी, पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची दोस्ती वाढावी. त्या दोस्तीचा मी आशिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नेहमी पाकिस्तान खुश रहावा आणि प्रगती करावी अशा वक्तव्य करुन अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अकबर लोन 23 मार्च रोजी कुपवाडा येथील जाहीर सभेत बोलताना पुढे म्हणाले की, माझ्या पलीकडे असणारा देश मुसलमानांचा देश आहे. आपली पाकिस्तानसोबत मैत्री कायम राहायला हवी. कोणी एक शिवी पाकिस्तानला दिली तर मग त्याला मी 10 शिव्या देईन असे अकबर लोन म्हणाले. सोशल मिडीयावर अकबर लोन यांनी केलेल्या या वक्तव्यावर नेटीझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्या सरकारमध्ये अकबर लोन हे कॅबिनेट मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. पाकिस्तान मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरला जात आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल चीड निर्माण झाली आहे.

Leave a Comment