6 भाषांमध्ये धोनीने विचारले जीवाला प्रश्न अन्…

dhoni
सध्या सोशल मीडियावर क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जीवा या दोघांचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. धोनी या व्हिडीओमध्ये आपल्या मुलीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. धोनीची मुलगी जीवा हिने यामध्ये तब्बल सहा भाषांमध्ये वडिलांना उत्तर दिली आहेत. या व्हिडीओत जीवाचा अनोखा अंदाज पाहून मोठ्या प्रमाणात हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


धोनी आणि जीवा शेअर केलल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. धोनीने यावेळी तब्बल सहा वेगवेगळ्या भाषामधून जीवाला आपली तब्येत कशी आहे याबाबत विचारणा केली. जीवानेही वडिलांनी विचारलेल्या भाषांमधून या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. यामध्ये तामिळ, गुजराती, बंगाली, उर्दू, भोजपुरी आणि पंजाबी या सहा भाषांमधून धोनीने जीवाला प्रश्न विचारली आहेत.

धोनीने आपल्या मुलीसोबतचे अनेक मजेदार व्हिडीओ याआधीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण आताच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत सर्वात गोड अंदाजात जीवाने भोजपुरी भाषेतून दिलेले उत्तर चाहत्यांना आकर्षित करत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. धोनीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Leave a Comment