लग्न करण्यापूर्वी ‘या’ वैद्यकीय चाचण्या अवश्य करुन घ्या

medical
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यतील आनंदमयी आणि महत्वाचा टप्पा असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत, जी लग्नाआधी प्रत्येक वधू-वरांनी एक गोष्ट न विसरता करावी. ती म्हणजे वैद्यकीय तपासणी. आता तुम्ही म्हणाल कसली तपासणी करावी. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर खाली लेखात आहे.

पहिले म्हणजे दोघांच्या रक्तगटाची तपासणी, दोघांचा रक्तगट काय आहे, तो दोघांना सूट होतो आहे का हे पाहणे गरजेचे आहे. कारण महिलेला गरोदरपणी त्रास होत नाही. एचआयव्ही आणि सेक्सुअली ट्रान्समिटेड आजाराची तपासणी प्रत्येकानेच लग्नाआधी करणे गरजेचे असल्यामुळे एकमेकांवरचा विश्वासही वाढतो.

कोणाला काय अनुवंशिक आजार आहेत हे त्या व्यक्तीलाही माहीत नसते. म्हणून अशा तपासण्या केल्या तर फार चांगले असते. सध्याच्या काळात साधारणतः लग्ने 30 वयानंतरच होतात. अशा वेळी स्त्रीने ओव्हरीज तपासून घेतल्या तर पुढे गरोदरपणी येणाऱ्या अडचणी कमी होतात. लग्नानंतर काही वर्षांनी संसारात बाळाच्या आगमनाची अनेकजण आतुरतेने वाट पहात असतात. अनेकदा स्त्री किंवा पुरुषात दोष असल्याने बाळ होत नाही. मग त्यावर उपाय करण्यात बऱ्याचदा वेळ निघून जाते. म्हणून लग्नाआधीच ही तपासणी केली तर पुढचे प्लॅनिंग सोपे जाते.

Leave a Comment