तिकीटबारीवर अक्षयच्या केसरीचा धमाका

keasri
होळीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘केसरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरही ‘केसरी’चाच रंग चढला असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पहिल्या चार दिवसांमध्ये खिलाडी कुमारचा अस्सल पंजाबी बाज असणाऱ्या या चित्रपटाने अनुक्रमे जवळपास 21, 17, 20 आणि 22 कोटी रुपयांची कमाई केली. या आकड्यांना जोडलं असता लक्षात येत आहे की, पहिल्या चार दिवसांमध्येच चित्रपटाच्या कमाईचे आकडे हे 70 कोटींच्याही पलीकडे गेले आहेत. ‘केसरी’ला गुजरात, बिहार, राजस्थान या भागांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले जाते. तर, चित्रपटाला मुंबईतही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘केसरी’च्या कमाईचे आकडे चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्श आणि रमेश बाला यांनी सर्वांपर्यंत पोहोचवले आहेत. इतिहासाच्या पानातं हरवलेल्या अशा एका युद्धाच्या स्मृती सारागढीच्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून जागवण्यात आल्या आहेत, जेथे देशाभिमानाची भावना प्रेक्षकांमध्येही ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या २१ शीख सैनिकांनी कसा प्रकारे एक असामान्य कर्तृत्त्व करत अफगाण सैनिकांशी लढा दिला होता याचीच शौर्यगाथा ‘केसरी’तून मांडण्यात आली आहे.

Leave a Comment