‘या’ टिप्स युनिवर्सल अकाउंट नंबरसाठी करा फॉलो

EPFO
सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आधार त्याच्या भविष्य निर्वाह निधाचा (पीएफ) असतो. त्यातच सध्याच्या घडीला पीएफ काढण्याची प्रक्रिया ऐवढी सुलभ झाली आहे कि आपल्या वारंवार पीएफ कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत नाही. त्यातच पीएफच्या सुविधेला अधिक सुलभ करण्यासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना-ईपीएफओ द्वारे जारी करण्यात आलेला युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) १२ अंकी एक विशिष्ट सदस्य आयडी असून हा नंबर पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्याला देण्यात येतो. आपला युएएन कधी कधी सॅलरी स्लिपवर देखील छापलेला असतो.

पण हा नंबर जर सॅलरी स्लिप किंवा अधिकृत कागदपत्रांवर छापलेला नसेल तर त्या कर्मचाऱ्याला युएएनला ईपीएफच्या युएएन वेब पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ वरुन मिळवू शकतात. पहिल्या नोकरीच्या सुरुवातीलाच प्रत्येक कर्मचाऱ्याला युएएन मिळतो. युएएन कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतरही एकच राहातो. पण एक नवीन ओळख ईपीएफओ प्रदान करतो, जो मूळ युएएनशी संबंधित आहे.

युएएन मिळविण्यासाठी तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या संकेतस्थळावर जाऊन तेथे लॉग इन करावे लागेल. ‘Know your UAN status’ वर क्लिक करुन ‘Important Links’ वर जा. आपले सदस्य आयडी नोंदवा, राज्य निवडा, क्षेत्रिय भविष्य निधी कार्यालय निवडा, नाव, जन्म, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड ही माहिती भरा. लक्षात ठेवा, की प्रॉविडन्ट फंड (PF) सदस्य आयडी, नंबर सॅलरी स्लिपवरुनही प्राप्त करता येतो. ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पीएफ सदस्य आयडीसह एक पिन पाठवण्यात येईल. त्याची नोंदणी करा. Validate OTP वर क्लिक करुन UAN प्राप्त करा. युनिवर्सल अकाउंट नंबर नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल.

Leave a Comment