व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच दाखल होणार दोन नवीन फिचर

whatsapp
नवी दिल्ली – तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअॅपवर बऱ्याचदा कोणताही मेसेज आला की आपण त्याची शहानिशा न करता तो सरळ समोरच्या व्यक्तिला फॉरवर्ड करतो. त्यामुळे चुकीचा मेसेज अनेकदा मोठ्या प्रमाणावर शेअर होतो आणि त्याचे काय परिणाम होतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आता याला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच नवीन फिचर दाखल होणार आहे. युजर्सना यात व्हॉट्सअॅपवर मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला हे कळणार असून, यामुळे वारंवार एकसारख्याच आशयाच्या येणाऱ्या मेसेजेसवर निर्बंध येणार आहेत. या फिचरची माहिती WABetaInfo ने दिली आहे.

लवकरच व्हॉट्सअॅपवर ‘Forwarding Info’ आणि ‘Frequently Forwarded’ हे फिचर्स येणार असल्याचे कंपनीने सांगितले. मेसेज इन्फो सेक्शनमध्ये ‘फॉरवर्डिंग इन्फो’ हे ऑप्शन उपलब्ध होणार असून, याद्वारे मेसेज किती लोकांना फॉरवर्ड झाला हे दिसणार आहे. यासाठी संबंधित मेसेज स्वत: फॉरवर्ड करणे आवश्यक आहे. चार पेक्षा जास्त युजर्सना मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याला ‘Frequently Forwarded’ टॅग असणार आहे. परंतु, या टॅगसहित असलेल्या मेसेजना फॉरवर्ड इन्फो फीचर उपलब्ध राहणार नाही. जुलै 2018 मध्येच या प्रक्रियेची सुरुवात झाली होती.

Leave a Comment