आयपीएलच्या इतिहासात तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा पहिला संघ मुंबई इंडियन्स

MI
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक. आतापर्यंत मुंबईने सात वेळेस पहिल्या ४ क्रमांकात स्थान मिळवले. त्यात त्यांना ३ वेळेस विजेतेपदावर तर १ वेळेस उपविजेतेपदावर मुंबईला समाधान मानावे लागले. २०१० मध्ये अंतिम सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्यानंतर मागील ६ सत्रात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडीयन्स २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये विजेतेपदाला गवसणी घातली व आयपीएलच्या इतिहासात तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला.
MI1
२०१८ च्या सत्रात मुंबईने सुर्यकुमार यादव, इशान किशन, एविन लुईसला संघात सामावुन घेतले होते त्यामुळे मुंबईचा संघ भक्कम झाला होता. पण नेहमी प्रमाणेच मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली होती आणि मुंबईला प्रत्येक सामना महत्त्वाचा झाला होता. सत्रात १४ सामन्यांतील ६ सामन्यांत विजय मिळवत मुंबईला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. निराशजनक सत्रानंतर मुंबईने २०१९ च्या सत्रासाठी युवराज सिंग, मलिंगा, बरिंदर सरणचा संघात समावेश केला तर ट्रांसफर विंडो वरुन क्विंटन डी कॉक व जयंत यादवला संघात सामावुन घेतले.
MI2
मुंबई संघाची जिम्मेदारी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, सुर्यकुमार यादव, मलिंगा, इशान किशन आणि युवराज सिंगवर असेल. रोहित सलामीला येणार हे जाहीर झाल्याने त्याच्या साथीला कोण सलामीला येईल हे पाहावे लागेल. तसे युवराजच्या समावेशामुळे मधली फळी भक्कम झाली आहे. पण २०१८ च्या सत्रात तसेच नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली चषकात शानदार कामगिरी केलेल्या इशान किशन व युवराज सिंगपैकी एकालाच अंतिम ११ मध्ये संधी मिळेत. तर ३० मे पासुन विश्वचषकाला सुरुवात होणार आहे त्यामुळे क्विंटन डी कॉक सत्रात किती सामने खेळतो हे महत्त्वाचे ठरेल. सलामीली कर्णधार रोहित शर्मासोबत कोण येत हे पाहावे लागेल.

संभावित संघ – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक/ एविन लुईस, सुर्यकुमार यादव, युवराज सिंग/इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, मयंक मार्कंडेय, मिशेल मॅक्लेगन, जसप्रित बुमराह, लसिथ मलिंगा
प्रशिक्षक – महेला जयवर्धने

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment