लोकसभा निवडणूक लढवणार नाही परेश रावल

paresh-rawal
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी घेतला असून या संदर्भात ट्विट करून अभिनेते परेश रावल यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात येथील अहमदाबाद येथून निवडणूक लढवली होती. आत्तापर्यंत चार याद्या भाजपने जाहीर केल्या असून आत्तापर्यंत २४९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकीसंदर्भात ट्विटरवरुन घोषणा करताना रावल म्हणाले, प्रसारमाध्यातील माझ्या मित्रांना मी विनंती करतो की माझ्या उमेदवारीसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अंदाज व्यक्त करु नका. पक्षाला याआधीच मी सांगितले आहे की यंदा निवडणूक लढवणार नाही. पण पक्षाचा एक सदस्य आणि पंतप्रधान मोदींचा समर्थक असेन असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment