… म्हणून निवडणूक लढवणार नाही उमा भारती

uma-bharati
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सांगितले. तिर्थयात्रेला मे महिन्यापासून १८ महिने जाण्यासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. मी २०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे उमा भारती यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणूक न लढवण्यामागचे कारण ५० वर्षीय उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे. २०१६ मध्येच निवडणूक लढवणार नसल्याचे मी सांगितले होते. गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर मला जायचे आहे. मी जर निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. कधीही मी माझा मतदारसंघ बदलू शकत नाही. माझ्यावर तेथील लोकांना विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानत असल्याचे उमा भारती यांनी म्हटले आहे. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी पुढे दीड वर्षात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०२४ मध्ये निवडणूक लढवेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शानदार बहूमत मिळवेन असेही उमा भारती म्हणाल्या. भाजप महासचिव रामलाल यांना आगामी निवडणूका न लढवण्याची माहिती दिली होती. उमा भारतींना तीर्थयात्रेसाठी जाण्याआधी रामलाल यांनी पक्षासाठी प्रचार करण्याबाबत सांगितले होते. मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत पक्षाने खूप काही दिले आहे. भाजपचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी ५ मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार असल्याचे, उमा भारतींनी सांगितले.

Leave a Comment