
चेन्नई सुपरकिंग आयपीएलच्या इतिहासातील एक सर्वोत्तम संघ. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासुन महेंद्रसिंग धोनी संघाचे नेतृत्व करत आहे. चेन्नईच्या पहिल्या सत्रात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर २०१० व २०११ अशा सलग दोन सत्रात चेन्नईने विजेतेपद पटकावले. कर्णधार धोनीसोबतच सुरेश रैना संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. फिक्सिंगमुळे चेन्नईच्या संघावर २०१६ व २०१७ अशी दोन सत्रांची बंदी घालण्यात आली. चैन्नईने आयपीएलच्या इतिहासात ३ वेळेस विजेतेपद तर ४ वेळेस उपविजेतेपद पटकावले.

तब्बल दोन वर्षांच्या बंदीनंतर २०१८ च्या सत्रात चेन्नई संघाने आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते आणि पहिल्याच सामन्यांत मुंबईवर विजय मिळवत संघाने धडाक्यात सुरावत केली होती. यात अंबाती रायडु, शेन वॉटसन, कर्णधार धोनी, सुरेश रैना, शार्दुल ठाकुर, ड्वेन ब्राव्होने मोलाचा वाटा उचलला. साखळीत १४ सामन्यांत ९ सामन्यांत विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले होते तर क्वालिफायर १ मध्ये सनरायझर्स हैद्राबादचा पराभव करत अंतिम सामन्यांत धडक मारली आणि अंतिम सामन्यांत सनरायर्झस हैद्राबादचा ८ गड्यांनी विजय मिळवत तीसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. चेन्नई सुपरकिंगसाठी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे कामगिरीतील सातत्य.

२०१८ च्या सत्राचाच संघ जवळपास या सत्रात खेळेल. विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आतुर असलेला अंबाती रायडु कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच विश्वचषकाच्या संघात तीसरा फिरकी गोलंदाज प्रवेश मिळवण्यास उत्सुक असलेल्या जडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. २०१८ चे सत्र गाजवणाऱ्या शार्दुल ठाकुर व दिपक चहरकडुन संघाला तशाच कामगिरीची अपेक्षा असेल. विश्वचषकामुळे धोनीने विश्रांती घेतली तर रैना कर्णधारपद सांभाळु शकतो.
आयपीएलच्या इतिहासातील एक सर्वोत्तम संघ, चेन्नई सुपरकिंग
संभावित संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडु, शेन वॉटसन, सुरेश रैना, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, कर्ण शर्मा, हरभजन सिंग, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहिर, दिपक चहर
प्रशिक्षक – स्टिफन फ्लेमिंग
शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com
