विराटच्या नेतृत्वात खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

RCB
सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ. पहिल्या ४ सत्रात दोनदा उपविदेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर पुढील ३ सत्रात संघाची कामगिरी पुरती ढासळली होती. विराट कोहली २०११ च्या सत्रापासुन संघाचे नेतृत्व करत आहे त्याची कामगिरी वरचेवर शिखर गाठत असताना तो संघाला मात्र एकदाही विजेतेपद मिळवुन देऊ शकला नाही. तसा विचार करत आयपीएलच्या सर्व सत्रात एकाच संघाकडुन खेळणारा विराट एकमेव खेळाडु ठरला आहे.
RCB1
२०१६ च्या सत्रात विराट कोहली, ख्रिस गेल, ए बी डीव्हीलीयर्सच्या बळावर तीसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती मात्र तीसऱ्या प्रयत्नात ही त्यांना अपयश आले. त्याच सत्रात तब्बल ९७३ धावा करत सत्रात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला. पण त्या नंतरच्या तीनही सत्रात संघाची कामगिरी ढासळली. संघ कोहली, डीव्हीलीयर्सच्या कामगिरीवर पुर्णपणे अवलंबुन आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आयपीएल मधील “चोकर्स” म्हंटले तर वावगे ठरणार नाही. २०१८ च्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १४ सामन्यांत ६ विजय मिळवत ६ व्या स्थानांवर समाधान मानावे लागले.
RCB2
यावेळेस संघाने शिमरॉन हेटमायर, स्टॉयनिस, शिवम दुबेला संघात घेत संघ मजबुत केला आहे. तसेच फलंदाजीची धुरा कोहली, ए बी, पार्थिव पटेलवर तर गोलंदाजीची मदार उमेश, चहल, वॉशिंग्टन सुंदर, साउदी व कुल्टर नीलवर असेल. तसेत युवा अष्टपैलु शिवम दुबेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल हे मात्र नक्की. पार्थिव पटेलसोबत अक्षदिप नाथ सलामीला येऊ शकतो नाहीतर कोहलीच पार्थिवसोबत सलामीला येईल तर मार्कस स्टॉयनिस किंवा कॉलिन डी ग्रॅंडहोमे फिनीशरची भुमिका सांभाळु शकतो.

संभावित संघ – विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, ए बी डीव्हीलीयर्स, मार्कस स्टॉयनिस/ कॉलिन डी ग्रॅंडहोमे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षदिप नाथ, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, टीम साउदी, नॅथन कुल्टर नील

प्रशिक्षक – गॅरी कर्स्टन

शंतनु कुलकर्णी, क्रिकेट लेखक
Page – fb/Cricket Articles instagram/cricketarticles twitter/cricketarticles
www.thedailykatta.com

Leave a Comment