भारतात लाँच होणार हुवाईचा फोल्डेबल ‘Mate X’ स्मार्टफोन

huawai
भारतात येत्या काही महिन्यात चीनची स्मार्टफोन कंपनी हुवाई फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X लाँच करण्याच्या तयारीत असून हुवाईने हा मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला होता. या फोनचा डिस्प्ले फोल्ड होतो. २,२९९ युरो (१ लाख ८० हजार रुपये) एवढी कंपनीने याची किंमत ठेवली आहे. याची किंमत भारतात टॅक्समुळे थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. भारतात ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये Huawei Mate X उपलब्ध होणार आहे.

हुवाई Mate X मध्ये 5G कनेक्टिव्हिटी (5G नेटवर्क यूज करू शकणार), यात 8 इंचीचा फ्लेग्जिबल OLED डिस्प्ले, या फोनचा डिस्प्ले फोल्ड केल्यानंतर डिस्प्ले 6.6 इंचीचा होतो. तर दुसऱ्या बाजूने फोल्ड केल्यानंतर 6.38 इंचीचा हा फोन होतो. यामध्ये Kirin 980 प्रॉसेसर, 4,500mAh क्षमतेची बॅटरी त्याचबरोबर 40 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सेलचा दुसरा आणि 8 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 GB रॅमसह ५१२ GB इन्टर्नल स्टोरेज देण्यात आले आहे.

Leave a Comment