रोहन श्रेष्ठासोबत विवाहबद्ध होणार श्रद्धा कपूर?

shraddha-kapoor
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही ‘स्ट्रीट डांन्सर’, ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या व्यवसायिक चर्चेसह वैयक्तिक कारणानेही श्रद्धा चर्चेत आहे. श्रद्धाचे नाव गेल्या काही दिवसांपासून फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासह जोडले जात आहे. दरम्यान, रोहन आणि तिच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना श्रद्धाने नकार दिला आहे.

पण श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. श्रद्धा, रोहन किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा एकमेकांना ओळखतात. पण दोघे एकमेकांना 2018 पासून डेट करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान यापूर्वी श्रद्धा आणि फरहान अख्तर रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे शक्ती कपूर खूश नसल्याचेही बोलले जात होते. शक्ती कपूर यांनी एका मूलाखतीत श्रद्धाने येत्या वर्षापर्यंत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता श्रद्धा आणि रोहन लग्नबंधनात अडकणार का? हे आगामी काळाच सांगेल.

Leave a Comment