गार्ड म्हणून काम करणाऱ्या सावी सिद्धू यांच्या पाठीशी उभे राहिले अवघे बॉलीवूड

saavi-siddhu
अनुराग कश्यपच्या कित्येक चित्रपटांत काम करणारे सावी सिद्धू मागील दिवसांपासून चर्चेत आहेत. काही काळापूर्वी ते अक्षय कुमार आणि आयुषमान खुराना मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना दिसत होते. पण आज ते गार्डचे काम करत आहते. सावी यांच्याकडे कोणतेच काम नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ते सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आहेत. त्यांनी त्यांचे हे दुःख फिल्म कम्पेनियन यांच्याकडे व्यक्त केले.

सावी यांच्याकडे कोणतेही काम नसल्याची बातमी सिनेवर्तृळात वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर बॉलीवूडमधील काही कलाकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सर्वप्रथम अनुराग कश्यप यांनी त्यांच्या कार्याला सलाम करते म्हटले आहे की, त्यांनी आपली मदत स्वतःच केली पाहिजे. त्यांची स्थिती पाहून त्यांना कोणीतरी काम दिले तर तो त्यांचा अपमान होईल.

त्यासोबतच अभिनेता राजकुमार राव याने यावर आनंद व्यक्त करत म्हटले की, सावी यांनी सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राजकुमार राव याने त्यांना विश्वास दिला की, लवकरच आपल्या कास्टिंग डायरेक्टर मित्राला सांगून त्यांचे ऑडिशन घेण्यास सांगेन. अनुराग आणि राजकुमार यांच्यानंतर सिंटाचे जनरल सेक्रेटरी सुशांत सिंह आणि निर्माते हंसल मेहता हे देखील सावींच्या पाठीशी उभे राहिले आहेत.


सुशांत सिंह यांनी म्हटले की, काहीवेळा पूर्वी मी सावी यांच्याशी बोलला आहे. त्यावेळी ते आनंदी वाटत होते. त्यांचे अभिनंदन करत सुशांत सिंह म्हणाले, सावी यांनी सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. काही वेळे करीता त्यांना काही काम भेटले नाही, पण त्यांनी वाईट वाटेला न जाता चांगला मार्ग निवडला ते उल्लेखनीय आहे. याबाबत हंसल मेहता म्हणाले, मला हे कळून आनंद झाला की त्यांनी कोणतेही चुकीचे काम करण्याऐवजी सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत. आम्ही अशा एका क्षेत्रात आहोत, जिथे काहीही होऊ शकते.

Leave a Comment