2 एप्रिलपासून ‘गुगल’च्या या सेवेचे शटडाऊन

google
2 एप्रिलपासून गुगलचे ‘Inbox by Gmail’ या सेवेचे शटडाउन होणार आहे. २०१४ मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती. गुगलचे हे लोकप्रिय मोबाईल अॅप गुगल प्लससारखेच शटडाउन करण्यात येत आहे. गेल्यावर्षीच या लोकप्रिय अॅपला बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला होता.

सध्या या फिचरचा वापर करणाऱ्यांना शटडाउन होण्याचे नोटिफिकेशन पाठवण्यात येत आहेत. येत्या 2 एप्रिलला गुगल प्लससह हे अॅप शटडाउन करण्यात येणार आहे. 2014 मध्ये या अॅपला जीमेलने लाँच केले होते. प्रॉडक्टिव्हिटीला वाढवण्यासाठी हे अॅपला लाँच करण्यात आले होते. या अॅपचा मुख्यत: ते युजर वापर करतात ज्यांना मोठ्या प्रमाणात ई-मेल येतात. युजर्स या अॅपच्या माध्यमातून ई-मेलला ऑटो रिप्लाय करू शकत होते. या शिवाय युजर्स बंडल्स किंवा बल्कमध्येही रिप्लाय करू शकत होते. गुगल प्ले स्टोरवरुन या अॅपला रिमूव्ह करण्यात आले आहे. सध्या जीमेल अॅपमध्ये ऑटो रिप्लाय, इनलाईन अटॅचमेन्ट सारख्या फिचर्सना गुगल इंटिग्रेट करत आहे. inbox by gmail या अॅपच्या शटडाउनंतर युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.

Leave a Comment