चीनी पोलीसांचा शहाणपणा; फरारच्या पोस्टरवर लावला आरोपीचा बालपणीचा फोटो

china
आपण कित्येकदा एखाद्या सराईत आरोपीचा वॉन्टेड असा पोस्टर नक्कीच पाहिला असेल. कुख्यात आरोपींना शोधण्यासाठी पोलीस अशा प्रकारचे पोस्टर लावत असतात. यावर आरोपीचा फोटो देखील असतो. पण याबाबतीत चीनच्या पोलिसांनी केला शहाणपणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ji Qinghai नावाच्या एका कुख्यात आरोपीचा बालपणीचा फोटो वापरुन चिनी पोलिसांनी वॉन्टेडचे पोस्टर तयार केले आहे. चीनच्या Zhenxiong शहरात ही घटना घडली आहे. या आरोपीविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीचा सध्याचा फोटो पोलिसांना न मिळाल्याने Zhenxiongचा लहानपणीचा फोटो त्यांनी वॉन्टेड पोस्टरवर वापरला. तो आरोपी शाळेत शिकत असतानाचा हा फोटो आहे.

पोलिस अधिकारी मिस्टर लुई यांनी म्हटले की, आरोपीचा सध्याचा फोटो आम्हाला न मिळाल्याने बालपणीचा फोटो आम्ही वापरला आहे. या आरोपीच्या चेहरेपट्टीत काहीही बदल झालेला नाही. तेव्हा जसे त्याचे तोंड, डोळे, नाक, ओठ होते ते आता देखील तसेच आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेले हे उत्तर ऐकून अनेकांना हसू अनावर झाले.

Leave a Comment