थूकरटवाडीत आमिर-किरणचा मराठमोळा अंदाज

aamir-khan
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात नुकतीच बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानने हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या मंचावर आमिर याआधीही आला होता. पण यावेळी आमिर आणि त्याची पत्नी किरण रावला मराठमोळ्या अंदाजात पाहिले गेले. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर या दोघांनी चक्क मराठीत स्कीटसुद्धा सादर केले.

यावेळी आमिर खान डोक्यावर टोपी, सदरा, पायजमा या अवतारात तर किरण रावने मराठमोळ्या अंदाजात पैठणी परिधान केली. किरण रावचा नाकात नथ, डोक्यावर पदर असा लूक पाहायला मिळत आहे. भाऊ कदमने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आमिर आणि किरण रावसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच या एपिसोडची चर्चा होती. त्यानंतर आमिर जेव्हा ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पोहोचला, तेव्हा त्याने तिथून फेसबुक लाइव्हसुद्धा केले होते. आपण आमिरला नेहमीच पडद्यावर अभिनय करताना पाहतो. पण प्रेक्षकांना आता किरण रावचाही अभिनय ‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. आमिरसोबत किरणनेही अभिनय केला आहे.

Leave a Comment