
इंडोनेशियाः सध्या सोशल मीडियावर एक जीवाचा थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक पर्यटक महिला समुद्र किनारी फोटो काढण्यासाठी उभी होते, त्याचवेळी एक जोरदार लाट येते आणि त्या महिलेला वाहुन नेते. याबाबत Shanghaiistने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ इंडोनेशियाच्या नुसा लॅम्बॉन्गच्या बेट डेव्हिल्स टियरशी संबंधित आहे, जिथे ही दुर्घटना घडली. एवढे होऊन देखील देवाच्या कृपेने महिला सुरक्षित आहे.
Viral Video: समुद्राच्या लाटेसोबत फोटो काढणे या महिलेला पडले महागात
डेव्हिल्सच्या टियरवर, एक महिला दोन्ही हात पसरवते आणि चेहऱ्यावर हसू आणून फोटोसाठी तयार होते. त्याच दरम्यान एक जोरदार लाट येते. त्या लाटेमुळे ती महिला दुर जाऊन पडली होती. डेली मेलच्या मते, हा व्हिडिओ शुक्रवारी पहिल्यांदा शेअर करण्यात आला, जो बघता खुप प्रमाणात व्हायरल झाला.
या महिलेने जास्त दुखापत झाली नाही, तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ बालीच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत असे लिहिले गेले आहे कि, या व्हिडीओला लाईक आणि शेअर करा म्हणजे लोक समुद्राच्या एवढे जवळ जाणे किती धोकादायक आहे हे पाहू शकतात. हे करू नका आणि सावधगिरी बाळगा.
