या बेसबॉल खेळाडूने केला तब्बल 2960 कोटींचा करार

mike-trout
अमेरिकाचा बेसबॉल खेळाडू माईक ट्राउटने जगातील सर्वात मोठा करार केला आहे. 27 वर्षीय माइकने अमेरिकेचा बेसबॉल संघ एलए एंजल्ससोबत 2960 कोटींचा करार केला आहे. हा करार 12 वर्षांसाठी आहे. या करारानंतर माईकला दरवर्षी सरासरी 247 कोटी रुपये आणि दर आठवड्याला सरासरी 4.7 कोटी रुपये मिळणार आहेत. माईकने हा सर्वात महागडा करार करत मेक्सिकोचा बॉक्सर केनेल्लो अल्व्हरेझला मागे सोडले आहे.

अल्व्हरेझने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये यूके स्पोर्ट्स स्ट्रीमिंग सर्व्हिस डीजेझेडसोबत 2680 कोटी रुपयांचा करार केला होता. ट्रॉउट अमेरिकनच्या मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) दोनदा सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून निवडला गेला आहे. तो 7 वेळा एमएलबी ऑल स्टार टीम आणि 4 वेळा सर्वात जास्त मौल्यवान खेळाडू म्हणून राहिला आहे. त्यांला ‘रुकी ऑफ द ईयर’ पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याने 1065 सामन्यांत 1187 हिट मारले आहेत.

खेळाडूंच्या दरवर्षीच्या कमाईबद्दल बोलायचे झाल तर याबाबतीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉइड मेवेदर अव्वल स्थानी आहे. 2018 च्या फोर्ब्सच्या यादीनुसार, त्यांचे सरासरी उत्पन्न 1962 कोटी आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी (765 कोटी) आणि पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (743 कोटी रुपये) तिसऱ्या स्थानावर आहे.

खिलाड़ियों के हर साल कमाई की बात की जाए तो अमेरिका के बॉक्सर फ्लायड मेवेदर नंबर-1 पर हैं। 2018 की फोर्ब्स लिस्ट के अनुसार उनकी सालाना औसतन कमाई 1962 करोड़ रुपए है। अर्जेंटीना के फुटबॉलर लियोनेल मेसी (765 करोड़) दूसरे और पुर्तगाल के क्रिस्टियानो रोनाल्डो (743 करोड़ रुपए) तीसरे नंबर पर हैं।

Leave a Comment