सलमान जेव्हा आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा या अभिनेत्री होत्या लहान

salman-khan
दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या आगामी ड्रीम प्रोजेक्ट इंशाअल्लाहमध्ये बॉलीवडूचा भाईजान सलमान खान हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो आलिया भट्टसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 1988मध्ये सलमानने बीवी हो तो ऐसी या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 4 वर्षे 6 महिन्यांनी आलियाचा जन्म झाला होता. तर आपण जाणून घेऊया सलमानच्या पदार्पणाच्या वेळी आताच्या आघाडीच्या अभिनेत्रींचे काय वय होते. ज्यांनी सलमान सोबत स्क्रिन शेअर केली आहे.
salman-khan1
जॅकलीन फर्नांडीज आणि सलमान खान यांनी रेस 3 या चित्रपटात एकत्र काम केले होते. जेव्हा सलमानने पदार्पण केले तेव्हा जॅकलिन 3 वर्ष आणि 11 महिन्यांची होती.
salman-khan2
अली अब्बास जाफर दिग्दर्शित भारत या चित्रपटात दिशा पटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बीवी हो तो ऐसी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर 4 वर्षांनी दिशाचा जन्म झाला होता.
salman-khan3
सलमानबरोबर कतरिनाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सलमानच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी कतरिना 5 वर्षांची होती. हे दोघे आता भारत चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत.
salman-khan4
प्रेम रतन धन पायो चित्रपटासाठी सलमान खान आणि सोनम कपूर एकत्र आले. सन 1988 मध्ये सलमानच्या पहिल्या चित्रपटाच्यावेळी सोनम 3 वर्षांची होती.
salman-khan5
सुलतान चित्रपटात आपण अनुष्का शर्मा आणि सलमान खानची रॉमँटिक केमेस्ट्री पाहिली होती. सलमानने बॉलीवूड पदार्पण केले तेव्हा अनुष्का फक्त तीन वर्षांची होती.
salman-khan6
सलमानच्या बॉडीगार्ड आणि बजरंगी भाईजान या चित्रपटात करीना कपूरने काम केले आहे. सलमानच्या पहिल्या चित्रपटाच्या दरम्यान करीना 7 वर्षे 11 वर्षांची होती.
salman-khan7
मुझसे शादी करोगी, सलाम-ए-इश्क या चित्रपटात सलमान खान आणि प्रियंका चाप्राने एकत्र स्क्रिन शेअर केली होती. 1988 मध्ये जेव्हा सलमान बॉलीवूडमध्ये प्रवेश केला प्रियंका 6 वर्षांची होती.

Leave a Comment