कार्तिक-साराच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

sara-ali-khan
अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात सारा आणि कार्तिक एकत्र काम करणार असल्याचे समोर आले आहे. नुकताच फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला आहे. सारा आणि कार्तिक त्यामध्ये रोमाँटिक अंदाजात दिसत आहेत.


अद्याप सारा आणि कार्तिक मुख्य भुमिकेत असलेल्या या चित्रपटाचे नाव ठरवण्यात आलेले नाही. पण लव्ह आज कलचा हा सीक्वल असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमुळे सारा- कार्तिकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच दोघांनाही ‘लव आज कल २’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान बाइकवर फिरताना पाहून तर चाहत्यांमध्ये आणखी चर्चा झाली होती.

या चित्रपटाच्या फर्स्ट लुकचा फोटो कार्तिक आर्यने ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. माझा आवडता चित्रपट निर्माता इम्तियाज अली, सारा अली खान आणि रणदीप हुड्डासह सुरू केलेल्या नवीन प्रवासाठी मी खूप उत्साही असून हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्याने लिहिले आहे.

Leave a Comment