जगामध्ये आहेत अशीही वस्तूसंग्रहालये

musume
वस्तू संग्रहालय म्हटले, की प्राचीन काळातील राजा-महाराजांची शस्त्रास्त्रे, पोशाख, मौल्यवान अलंकार, दुर्मिळ वस्तू, उत्खननातून सापडलेल्या, तत्कालीन संस्कृती दर्शविणाऱ्या वस्तू आणि त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. अलीकडच्या काळामध्ये काही देशांमध्ये जुन्या, व्हिंटेज गाड्यांपासून चीझ पर्यंत, आणि न खाता येण्याजोग्या वस्तूंपासून, प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या प्रजातींचे अवशेष प्रदर्शित करणारी संग्रहालये पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. पण या सर्व संग्रहालयांच्या व्यतिरिक्त अशीही काही संग्रहालये जगामध्ये आहेत, जी जरा ‘हटके’ आहेत.
musume1
क्रोएशिया देशामध्ये असलेले ‘म्युझियम ऑफ ब्रोकन हार्ट्स’ हे संग्रहालय प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांना समर्पित आहे. या संग्रहालयामध्ये प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांनी आपल्या पूर्वप्रेमींची आठवण दर्शविणारी एखादी वस्तू, आणि या वस्तूशी निगडीत आठवण लिखित स्वरूपामध्ये या संग्रहालयामध्ये ठेवली आहे. या संग्रहालयाची संकल्पना क्रोएशियन आर्टिस्ट्स ओलीन्का विस्तिका, आणि द्रेझेन ग्रुबिसिक यांची असून, त्यांचे परस्परांशी असलेले प्रेमसंबध संपुष्टात आल्यानंतर इतर प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांसाठी अशा प्रकारचे संग्रहालय सुरु करण्याची कल्पना त्यांना सुचली. असे संग्रहालय आपण सुरु करीत असल्याचे त्यांनी आपल्या मित्रपरिवाराला कळविले आणि आपल्या पूर्वप्रेमींच्या आठवणींशी निगडीत वस्तू संग्रहालयाला देण्यात येण्याबद्दल विनंती केली. अशा रीतीने हे संग्रहालय सुरु झाले आणि लोकप्रिय ही झाले. २०११ साली ‘युरोपमधील सर्वात आगळे वेगळे वस्तूसंग्राहलय’ असल्याचा पुरस्कारही या संग्रहालयाला मिळाला.
musume2
मॅसच्युसेट्स येथे ‘म्युझियम ऑफ ऑफुल आर्ट’ असून, या संग्रहालयामध्ये चित्रकलेचा सपशेल फसलेला प्रयत्न दर्शविणारी सुमारे सातशे पेंटींग्ज आहेत. या खासगी संग्रहालयाच्या व्यवस्थापकांच्या मते या संग्रहालयामध्ये असलेली पेंटींग्ज इतकी वाईट आहेत, की त्याकडे दुर्लक्ष करणे केवळ अशक्य असल्याने या पेंटींग्जचा संग्रह केला गेला आहे. पाहता पाहता हे संग्रहालय लोकप्रिय झाले, आणि सुरुवातीला एका इमारतीच्या बेसमेंट मध्ये असलेला हा संग्रह आता मॅसेच्युसेट्समध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शित केला गेला आहे. जपान मधील ओसाका शहरामध्ये ‘मोमोफुकू अँडो इन्स्टंट रामेन म्युझियम असून, हे संग्रहालय इंस्टंट कप नूडल्स आणि पॅकेट नूडल्सची विविधता दर्शविणारे आहे. तसेच कुठल्या ब्रँडचे नूडल्स कुठल्या वर्षापासून उपलब्ध होऊ लागले, याचीही माहिती संबंधित नूडल्सबरोबरच प्रदर्शित केली गेली आहे.
musume3
अमेरिका आणि कॅनडा देशांमध्ये झुरळांच्या विविध प्रजाती दर्शविणारी संग्रहालये असून, यामध्ये झुरळांना रंगेबिरंगी पोशाख घालण्यात आले आहेत, तर आणखी एका संग्रहालयामध्ये आजवर बाजारात आलेल्या पण अजिबात न खपलेल्या वस्तूंचे संग्रहालय अॅन आर्बर प्रांतामध्ये आहे. यामाध्ये पेप्सीने एके काळी बाजारामध्ये आणलेल्या पेप्सी ब्रेकफास्ट कोला पासून हाईन्झ कंपनीचे जांभळे व हिरव्या रंगाचे केचप, कोलगेट कंपनीचे ‘बीफ लसान्या’, क्लेइरोल कंपनीचा दह्याचा शँपू, हार्ले डेव्हिडसन कंपनीने बाजारामध्ये आणलेले परफ्युम अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

Leave a Comment