या आहेत जगातील काही ‘टॉप डॉलर’ वस्तू

thing
जगातील अनेक अतिश्रीमंत व्यक्तींच्या खर्चाच्या सवयी चर्चेचा विषय ठरत असतात. त्यातूनही ज्या वस्तूसाठी सर्वसामान्य माणूस पाच-पन्नास रुपयांच्या पेक्षा जास्त पैसा खर्च करण्याचा विचारही करणार नाही, अशा काही वस्तूंवर ही धनाढ्य मंडळी हजारो डॉलर्स सहज खर्च करीत असल्याने या वस्तू आताच्या काळामध्ये ‘टॉपडॉलर’, म्हणजे जगातील सर्वाधिक महागड्या वस्तूंपैकी समजल्या जात आहेत. ‘मॉ ब्लांक, व व्हॅन क्लीफ अँड आर्पेल्स’ यांनी तयार केलेल्या बॉल पॉइंट पेनची किंमत ७३०,००० अमेरिकन डॉलर्स असून, या पेनाला ‘मिस्टीरियस मास्टरपीस’ असे नाव देण्यात आले आहे. या पेनवर ४८० हिरे आणि इतर रत्ने जडविण्यात आली असून, अशा प्रकारच्या केवळ नऊ पेनांची ‘लिमिटेड एडिशन’ सादर करण्यात आली होती. या नऊ पेनांपैकी प्रत्येक पेन तयार करण्यासाठी तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागला होता.
thing1
तब्बल ९,०७१ किलो अॅमेझोनियन क्रिस्टल स्टोनचा वापर करून बनविण्यात आलेला बाथटब जगातील सर्वाधिक किंमतीच्या बाथटब्स पैकी एक असून, या बाथटबचे वजन चार हजार पौंड आहे. ‘बाल्डी’ ब्रँडने हा बाथटब डिझाईन केला असून, याची किंमत ८४५,००० डॉलर्स आहे. गाडी उभी करण्यासाठी पार्किंग स्पेस बद्दल बोलायचे झाले, तर अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराच्या मॅनहॅटन परिसरामध्ये गाडी उभी करण्यासाठी पार्किंग स्पेस तब्बल एक मिलियन डॉलर्सला उपलब्ध आहे. या पार्किंग स्पेसेस जगातील सर्वाधिक महागड्या पार्किंग स्पेसेस आहेत.
thing2
महागड्या गोष्टींमध्ये प्राण्यांच्या काही प्रजातींचा देखील समावेश आहे. एका चीनी व्यावसायिकाने २०११ साली ‘तिबेटन मॅस्टिफ’ या प्रजातीचे कुत्रे तब्बल १.५ मिलियन डॉलर्सला खरेदी केले असून, ‘बिग स्प्लॅश’ असे सार्थ नावदेखील त्याने आपल्या कुत्र्याला दिले आहे. ‘मॅग्नेटिक फ्लोटिंग बेड’ हा जगातील सर्वात महागडा बेड असून, हा बेड हवेमध्ये तरंगता (suspended) रहात असून, ९०७ किलो वजन पेलण्याची क्षमता या बेडमध्ये आहे. या बेडची किंमत १.६ मिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.
thing3
सापशिडी, किंवा मोनोपोली असल्या खेळांसाठी एखादी व्यक्ती फार तर दीड-दोनशे रुपये खर्च करू शकते, मात्र सॅन फ्रान्सिस्को मधील एका जवाहिऱ्याने १९८८ साली तयार केलेल्या मोनोपोलीच्या सेटची किंमत दोन मिलियन डॉलर्स होती. ही बोर्ड गेम २३ कॅरट शुद्धतेच्या सोन्याचा वापर करून बनविण्यात आली असून, यामध्ये माणिक, आणि तत्सम मौल्यवान रत्नांचा वापरही करण्यात आला होता.

Leave a Comment