अवघ्या काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला रेडमी नोट 7 प्रो

redmi
शाओमी कंपनीने रेडमी नोट 7 च्या यशानंतर त्याची पुढील आवृत्ती असलेला रेडमी नोट 7 प्रो नुकताच लाँच केला होता. दुपारी १२ वाजता या फोनचा दुसरा फ्लॅश सेल सुरू झाला होता. ग्राहकांनी या सेलला देखील अतिशय भरघोस प्रतिसाद दिला आहे. देशभरातील ग्राहकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा फोन रेडमी आणि फ्लिपकार्टवर अवघ्या दोनच मिनिटात आऊट ऑफ स्टॉक झाला.

दरम्यान अद्याप याचा तिसरा सेल कधी होणार आहे याबाबतची कोणतीही माहिती नाही. पण कंपनीच्या दोन्ही सेलला मिळालेला प्रतिसाद पाहता कंपनीमार्फत लवकरच तिसरा सेल होईल. रेडमी नोट 7 प्रोचे ब्ल्यू, ब्लॅक आणि रेड रंगातील तीन व्हरायटीचे फोन सेलमध्ये उपलब्ध होते. पण सर्व फोन अवघ्या दोन मिनिटांत विकले गेले. या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या किंमत 13 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment