पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नाही – मायावती

mayawati
लखनौ – आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. आमची आघाडी सध्या चांगल्या स्थितीत असून आपण निवडणूक पक्ष आणि जनहितासाठी लढणार नसल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. आपण पुढे गरज पडल्यास कोणत्याही जागेवरुन निवडणूक लढवू शकतो असेही मायावती यांनी म्हटले आहे. सपा-बसपाची उत्तर प्रदेशात आघाडी झाली आहे.

याबाबत माहिती देताना मायावती पुढे म्हणाल्या की, मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून मला पुढे वाटले तर मी कोणतीही जागा रिक्त करत निवडणूक लढवून लोकसभा खासदार होऊ शकते. निवडणूक लढवायचे मी ठरवले तर मनाई करुनही कार्यकर्ता माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी जातील. इतर जागांवर याचा परिणाम होईल. यामुळेच हा निर्णय आपण घेतला आहे.

Leave a Comment