‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार दिग्गज स्टारकास्ट

biopic
काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेल्या टोटल धमाल चित्रपटात बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण झळकला होता. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या यशानंतर अजयला अनेक चित्रपटांचे प्रस्ताव येत असून त्यामध्ये दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. अजय या चित्रपटानंतर लवकरच अभिषेक दुधैया यांच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे.


अजय देवगणसह या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, राणा दग्गुबती आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजय या चित्रपटामध्ये स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात येणार आहे. कर्णिक हे भारत पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. भूज तळावरील धावपट्टी हवाई दलाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. कर्णिक यांनी त्यावेळी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील ३०० महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. या चित्रपटात त्यांचा ही धाडसी निर्णय आणि हवाई दलाची वाटचाल पहायला मिळणार आहे.

Leave a Comment