‘बिग बॉस मराठी’ने आपले लोणावळ्यातील बस्तान येथे हलवले

bigg-boss
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला छोट्या पडद्यावरील विवादस्पद शो बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व येणार आहे. शोमध्ये आता कोण कोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कलाकारांच्या वागण्यामुळे ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या सेटमुळे देखील प्रसिद्ध आहे. त्यातच लोणावळ्यामध्ये बिग बॉसच्या या पर्वाचे शूटिंग होणार नाही हे ऐकून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लोणावळ्यात हिंदी बिग बॉस प्रमाणेच मराठी बिग बॉसचा सेट देखील उभा करण्यात आला होता. पण या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई येथील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ‘बिग बॉस मराठी २’चा सेट उभारण्यात आला आहे. याआधी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये बिग बॉस मल्याळमचे शुटिंग करण्यात आले होते. मुंबई येथील गोरेगाव कलाकार आणि शो सेटच्या दृष्टिने सोयीस्कर असल्याने हा निर्णय शो निर्मात्यांनी घेतला असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment