गोध्रा जळीतकांडाप्रकरणी याकूब पटालियाला जन्मठेप

godhra
अहमदाबाद – याकूब पटालियाला अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने गोध्रा जळीतकांडाप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याचबरोबर या प्रकरणातील तीन जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी आग लावली होती. या डब्यातील बहुसंख्य प्रवासी हे कारसेवक होते. या घटनेत ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. गुजरातमधील दंगलीसाठी गोध्रा येथील जळीतकांड हे कारणीभूत ठरले होते. विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने बुधवारी या प्रकरणातील आरोपी याकूब पटालियाला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याकूबचा देखील साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावणाऱ्या जमावात समावेश होता.

Leave a Comment